येवला ( नाशिक ) -ओबीसी आरक्षणाकरता प्रत्येकाचा खारीचा वाटा असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( NCP leader Chhagan Bhujbal ) यांनी आज येवला येथे त्यांच्या मतदारसंघात ( Yewla constituency ) दिली. येवला येथे आले असताना त्यांनी मतदार संघातील नागरिकांसोबत चर्चा केली. ओबीसी राजकीय आरक्षण ( OBC reservation ) लढ्याला यश मिळाल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळ हे आपल्या मतदार संघात आले यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ते बोलत होते.
ओबीसी आरक्षणाकरता लढणाऱ्यांना धन्यवाद -विशेषता सर्व पक्षातील ओबीसी जे जे रस्त्यावर आले घोषणा देत राहीले आंदोलने केली. हरी नरके ( Hari Narke ) सारख्यांनी ज्यांनी ज्यांनी त्या ओबीसीच्या पाठिंबासाठी जे लेख लिहिले, वर्तमानपत्रातून अनेकांनी लेख लिहिले. तेव्हा महेश झगडे साहेबांच्या बाटीया कमिशनच्या ( batia commission ) सदस्यांनी रात्री तीन तीन वाजेपर्यंत वाद घालून या आयोगाचा जो काही रिपोर्ट तयार झाला. हा बरोबर कसा होईल याकडे लक्ष दिले. रोजच्या रोज मी त्यांच्याशी संपर्कात होतो.