नाशिक - कोकणातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंते प्रकाश शेंडेकर यांना आमदार नितेश राणे यांनी जगबुडी नदीवरील पुलाच्या कठड्याला बांधुन अपमानास्पद वागणूक दिली. याप्रकरणी नितेश राणेंवर कठोर कारवाई व्हावी व या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील अभियंता संघटनेने सोमवारी नाशिक बांधकाम भवन येथे निषेध आंदोलन केले.
नितेश राणेंवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी नाशिकमध्ये अभियंता संघटनेचे आंदोलन - engineers
अभियंत्यांवर जे वारंवार हल्ले होत आहेत, त्यांचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याची माहिती या संघटनेने दिली.
अभियंत्यांवर जे वारंवार हल्ले होत आहेत, त्यांचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. कोकणात प्रकाश शेडेकर यांच्यावर पोलिसांसमोर हल्ला झाला. ज्यांच्याकडे कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याचे काम आहे, त्यांच्यासमोर असे हल्ले होत आहेत. मग आम्ही अभियंत्यांनी कोणाकडे संरक्षण मागावे, काम कसे करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे राणे व खेडकर यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी अभियंता घटनेची मागणी केली. यावेळी जिल्ह्यातील तीनशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात उपस्थित होते.
यासंदर्भात नाशिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी अधिकारी वर्गातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला आहे. अशा घटना होऊ नयेत. यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली.