महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO: पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; 7 आरोपी अटकेत, 4 फरार - मनमाड पोलीस

मनमाड शहरातील आंबेडकर चौकात राहणाऱ्या राजेंद्र आहिरे या तरुणाला पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉड, तलवार व लाठ्याकाठ्याने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे.

manmad youth attack
पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला, 7 आरोपी अटक तर 4 फरार

By

Published : Mar 14, 2020, 5:39 PM IST

मनमाड (नाशिक) - पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला भर चौकात लोखंडी रॉड, तलवारीसह लाठ्याकाठ्याने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या 11 जणांपैकी 7 जणांना अटक केली आहे. तर 4 आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेत असल्याचे पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला, 7 आरोपी अटक तर 4 फरार

हेही वाचा -छपाक : पिंपरी-चिंचवडमध्ये रंग खेळताना अल्पवयीन मुलावर अ‌ॅसिड हल्ला

मनमाड शहरातील आंबेडकर चौकात राहणाऱ्या राजेंद्र आहिरे या तरुणाला पूर्ववैमनस्यातून येथील पाकिजा कॉर्नर या ठिकाणी तलवार लोखंडी रॉड लाठ्या काठ्याने मारले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी याबाबत त्याची आई शुभांगी आहिरे यांची तक्रार घेऊन शेखर पगारे, शुभम पगारे, वैभव पगारे, निकेश ओव्हळ, सचिन ओव्हळ, क्षितिज कटारे,आदित्य कटारे, अविनाश कटारे, पिंटू कटारे, भरत झालटे, निलेश गायकवाड यांच्यासह आदींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 7 जणांना अटक केली असून यातील 4 आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे साळवे यांनी सांगितले आहे.

तक्रारदार व आरोपी यांच्यात अनेक दिवसांपासून पूर्ववैमनस्यातून वाद होते. राजेंद्र हा पाकिजा कॉर्नर येथे फिरत असताना आरोपींनी त्यास शिवीगाळ करत मारझोड केली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मालेगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांनी तपासाची चक्रे फिरवत 7 आरोपींना अटक केली असून, उरलेले 4 आरोपीचा शोध सुरू असून, त्यांनादेखील लवकरच अटक करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा -देव तारी त्याला कोण मारी, दाम्पत्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नात पत्नीचा वाचला जीव

ABOUT THE AUTHOR

...view details