सटाणा (नाशिक) - बागलाण तालुक्यातील साकोडे येथे रवींद्र यशवंत साबळे या १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्या राहत्या घरापासून जवळच असलेल्या गोविंदा वाधू गायकवाड यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.
नाशकातील साकोडे बागलाणमध्ये 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या - रवींद्र यशवंत साबळे आत्महत्या
डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सटाणा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या तरुणाने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तालुक्यातील मोठे साकोडे येथील रवींद्र साबळे या तरुणाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले किंवा याच्यामागे कोणाचे कट-कारस्थान आहे का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. साकोडेचे कामगार पोलीस पाटील नंदन देवाजी देशमुख यांनी सटाणा पोलिसांना याबाबतची खबर दिली. यानंतर सटाणा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला.
डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत सटाणा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या तरुणाने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास सटाणा पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश जाधव, जयंतसिंग सोळंके, राहुल शिरसाट करत आहेत.