नाशिक - येवला तालुक्यातील राजापूर येथे दुपारी तीन ते साडेतीन दरम्यान अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा मका, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला असून परत एकदा पावसामुळे शेतकऱ्याला नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
येवल्यातील राजापूर येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, शेतात काढून ठेवलेले कांदा पीक भिजले - Damage to agricultural crops due to rainfall
येवला तालुक्यातील राजापूर येथे दुपारी तीने ते साडेतीन दरम्यान अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा, मका, गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला आहे.
येवल्यातील राजापूर येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, शेतात काढून ठेवलेले कांदा पीक भिजले
राजापूर येथे रांगडा कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. काही शेतामध्ये कांद्याच्या पोळी पडलेले आहे. अजून काही शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, कांदा काढणी सुरू असताना अचानक आलेल्या पाऊसाने मोठा फटका पिकांना बसणार आहे. शेतकऱ्यांना आधीच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कांद्याचे भाव कमी झाल्याने फटका बसलेला आहे. यातच पुन्हा निसर्गाने अचानक वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.