नाशिक -जिल्ह्यात कोरोना दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. त्यामुळे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. अशात लग्न समारंभासाठी मोजक्याचे लोकांना उपस्थित राहण्याची मुभा होती. नागरीकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करत परिवारातील लोकांमध्ये लग्नकार्य पार पाडले. मात्र, सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नवीन जोडप्यांना हनीमून ट्रिप रद्द कराव्या लागल्याने जोडप्यांने नाराजी दिसून आली.
स्वप्न राहून गेले
2020 मधील मेमध्ये माझे लग्न ठरले होते. मात्र, त्यावेळी कोरोनाची पहिली लाट आल्याने घरच्यांनी एकत्रित येत सर्वानुमते लग्न 2021मध्ये करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 22 एप्रिल ही तारीख धरली होती. कोरोनाची दुसरी लाट हे कधी वाटले नव्हते. मात्र, त्याच महिन्यात नाशिक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला. अशात आता पुन्हा लग्न पुढे ढकलणे शक्य नव्हते म्हणून आम्ही घरातील वीस जणांच्या उपस्थित लग्न समारंभ पार पडला. लग्न झाल्यानंतर प्रत्येक जण हनीमून ट्रिपसाठी नियोजन करत असतो, आम्हीही केले होते. मात्र, त्याच महिन्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे घराबाहेर पडणे अशक्य होते म्हणून लग्नानंतरच्या हनीमून ट्रिपचे स्वप्न राहून गेल्याची खंत एक तरुणाने बोलून दाखवली.
सहा महिन्यात 463 विवाह नोंदी