नाशिक - कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय जाहिर केला आहे. तर साठेबाजीला आळा घालण्यासाठी काही मर्यादा घातल्या आहेत. यावर लासलगाव बाजार समितीचे सभापती जंयदत्त क्षिरसागर यांनी कांद्याचे भाव कोसळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांद्याचे भाव कोसळणार हेही वाचा - कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय...
महाराष्ट्रासह अनेक राज्यात पूरपरिस्थितीमुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यात खरिपातील कांदा अजून बाजारात न आल्याने कांद्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निणर्य घेतल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. या निर्णयाचा ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
शहरी भागात कांद्याचा दर ६० रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या एक महिन्यांपासून कांदा दरामध्ये दररोज वाढ होत आहे. शनिवारी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव झाले. तेव्हा उन्हाळी कांद्याला किमान ११०० रुपये क्वींटल तर कमाल ३६०० रुपये क्वींटल दर होते. कांदा दरावर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये दोनदा शिष्टमंडळ पाठवून बाजारभाव वाढीबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा - आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या FIR मध्ये शरद पवारांचे नावच नाही !