नाशिक- नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील वीटभट्टी येथे राहणाऱ्या कुटुंबातील तिघा भावंडांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यात एका नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशकात तिघा भावंडांना विषबाधा; एकाचा मृत्यू - नाशिकमध्ये विषबाधा
नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील वीटभट्टी येथे राहणाऱ्या पवार कुटुंबातील तिघा भावंडांना जेवणातून विषबाधा झाली. या घटनेत शुभम पवार या नऊ वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. तर, पूजा पवार आणि त्यांचा चुलत भाऊ बाबू वाघ यांची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा- जेव्हा लतादीदींच्या म्हणण्यानुसार निर्मात्यांनी शम्मी कपूर यांना स्टूडिओबाहेर काढले होते...
काल (शुक्रवारी) रात्री नाशिकरोडच्या विहितगाव परिसरातील वीटभट्टी येथे राहणाऱ्या पवार कुटुंबातील तिघा भावंडांना जेवणातून विषबाधा झाली. या घटनेत शुभम पवार या नऊ वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला. पूजा पवार आणि त्यांचा चुलत भाऊ बाबू वाघ यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमक मुलांनी काय खाल्ले? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.