महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी काळाराम मंदीर प्रवेशासाठी सत्याग्रह केला; मात्र मंदिराचे प्रवेशद्वार कधीच ओलांडले नाही! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर प्रवेश न्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. मात्र, त्यांनी स्वत: या मंदिरात कधीच प्रवेश केला नाही.

Kalaram Temple
काळाराम मंदिर

By

Published : Dec 7, 2020, 1:54 PM IST

नाशिक - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक आंदोलनांमध्ये नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष महत्त्व आहे. डॉ बाबासाहेबांनी अनेक दिवस विचार केल्यानंतर या सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले होते. बाबासाहेब हे सत्याग्रहाचे नेतृत्व करणार असे समजल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते. हा सत्याग्रह 5 वर्ष 11 महीने आणि 5 दिवस सुरू होता. अखेर अस्पृश्य समाजाला 2 मार्च 1930 या दिवशी काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला. मात्र, सत्याग्रहाचे नेतृत्व करून सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच काळाराम मंदिरात प्रवेश केला नसल्याची माहिती नाशिकचे साहित्यिक डॉ. संजय जाधव यांनी दिली.

काळाराम मंदिर सत्याग्रहाची माहिती देताना साहित्यिक डॉ. संजय जाधव

असा झाला होता मंदिर प्रवेश -

काळाराम मंदिर सत्याग्रहात नाशिक जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून नागरिक सहभागी झाले होते. 2 मार्च 1930 या दिवशी सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत
डी. व्ही. प्रधान, बाळासाहेब खरे, स्वामी आनंद, शंकरराव गायकवाड, भाऊराव गायकवाड, कर्मवीर दादासाहेब गायकवाड उपस्थित होते. यावेळी धोतर, अंगरखा, पुणेरी जोडा, पंचा कपाळावर लाल टिळा लावून शंकरराव गायकवाड यांनी गोदावरीत उडी घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांना पोलिसांनी जबर मारहाणही केली होती. आंबेडकर चळवळीतील तरुणाने रामकुंडात आंदोलन केले हे समजल्यानंतर ब्रिटिश जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी आले होते. यावेळी मंदिर परिसरात सनातन्यानीं शेकडो आंबेडकर अनुयायींवर दगडफेक केली. मात्र, तरीसुद्धा सुद्धा आंदोलकांनी माघार घेतली नाही. अखेर त्यांना मंदिर प्रवेश मिळाला.

आम्हीही सजीव माणसे आहोत -

आम्हाला काळाराम मंदिरात प्रवेश करून रामभक्त बनायचे नाही. तर, या भारत देशात असणाऱ्या दगडाच्या देवाला आणि जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की आम्हीही सजीव माणूस आहोत. जो धर्म आम्हाला स्विकारत नाही त्या ठिकाणी लाचार होऊन काय उपयोग? असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सत्याग्रहानंतर म्हणाले होते. त्यांनी नंतर बौद्ध धर्माचा स्विकार केला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details