नाशिक - देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांना समुपदेशन करण्याची गरज आहे, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. तसेच समुपदेशन करून लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता समुपदेशन करण्याची गरज'
जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भुजबळ पुढे म्हणाले, देशात अनेक समस्या आहेत. जीडीपी घसरला आहे. बेरोजगारीचे प्रश्न आहेत. कारखानेही बंद होत आहेत. रुपयाची किंमत घसरत आहे. मात्र, हे सर्व प्रश्न देशापुढे असताना रोज नवीन काहीतरी समोर आणायचे आणि चर्चा घडवत राहायचे यामुळे प्रमुख विषय बाजूला राहत आहेत, असे ते म्हणाले. देशात शांतता कशी राहील यासोबत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा, असे मत त्यांनी मांडले आहेत. तसेच केंद्र सरकारला काही कायदे करायचे असतील तर आधी चर्चा करावी आणि मग त्यावर निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -वयाच्या ९७ व्या वर्षी निवडणुकींच मैदान गाजवत आजीबाई बनल्या सरपंच