नाशिक - सिन्नर तालुक्यातील उजनी येथे सातनारे कुटुंबात शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हणामारीमध्ये अनिल त्र्यंबक सातनारे याच्या मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले.
सिन्नर तालुक्यातील उजनी येथे शेतीच्या वादावरून हाणामारी, एकाचा मृत्यू - Nashik Crime News
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील उजनी येथे सातनारे कुटुंबात शेतीच्या वादातून दोन गटात हणामारी झाली. या हणामारीत एकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले.
सिन्नर तालुक्यातील उजनी येथे शेतीच्या वादावरून हणामा
दरम्यान अधिक माहिती अशी कि, सिन्नर तालुक्यातील उजनी येथे दोन कुटुंबात वादावादी झाली. याचे रूपांतर हाणामारीत होऊन यामध्ये अनिल सातनारे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेत अन्य पाच गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेळोवळी पोलीस प्रशासनाला तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने ही घटना घडली असल्याचा नातेवाईकांनी पोलीस प्रशासनावर आरोप केला.