महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

या अर्थसंकल्पानंतर ग्राहक घर घेण्यासाठी येतील का?, बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजी - News about the builders

या अर्थसंकल्पात नंतर बांधकाम व्यावसायिक नाराज झाले आहेत. या अर्थ संकल्पा नंतर ग्राहक घर घेण्यासाठी येतील का असा प्रश्न व्यावसायिकानी विचारला आहे.

disappointment-among-the-builders-after-the-budget
या अर्थसंकल्पा नंतर ग्राहक घर घेण्यासाठी येतील का?, बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजी

By

Published : Feb 1, 2020, 8:47 PM IST

नाशिक -या अर्थसंकल्पानंतर ग्राहक घर घेण्यासाठी येतील का असा प्रश्न बांधकाम व्यावसायिकांना पडला आहे. सरकारने वैयक्तिक कर प्रणालीत सुटू दिली असली तरी, कितपत पैसे घराचा हप्ता भरण्यासाठी ग्राहकाकडे शिल्लक राहतील, असा प्रश्न बांधकाम व्यवसायिकांना पडला आहे.

या अर्थसंकल्पा नंतर ग्राहक घर घेण्यासाठी येतील का?, बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजी

बांधकामासाठी लागणारे अनेक साहित्य खरेदीवर 28 टक्के जीएसटी लागत असून त्यामुळे देखील काही प्रमाणत घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे. या बजेटमध्ये सिमेंट वरील जीएसटी 28 टक्के हुन 18 टक्के पर्यंत खाली येतील अशी अपेक्षा बांधकाम व्यवसायकांना होती. मात्र, अर्थ मंत्र्यांनी जीएसटी बाबत कुठलाच निर्णय न घेता हा विषय पुढे ढकलल्याचा बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. बांधकाम करण्यासाठी बँकेकडून (प्रोजेक्ट लोन ) आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा बांधकाम व्यवसायाची होती. मात्र, तीही पूर्ण न झाल्याने हा अर्थसंकल्प बांधकाम व्यावसायिकांसाठी निराशाजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details