दिंडोरी(नाशिक) -दिंडोरी तालुक्यात जानोरी येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील यापूर्वी आढळलेल्या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यातच जानोरी येथील एका 53 वर्षीय रुग्ण नाशिक येथील अशोका हॉस्पिटल येथे उपचार घेत होता. त्याचा स्वॅब 25 मे रोजी घेण्यात आला होता. आज त्याचा अहवाल आला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिंडोरी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, भाजीपाला विक्रेत्याला लागण
नाशिक शहरासह ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा फैलाव झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य विभागाने जानोरी येथील रुग्णाच्या संपर्कातील लोकांना दिंडोरी तालुक्यातील उपचार केंद्रावर हलविले आहे. जानोरी गाव व परिसर सील करण्यात आला असून परिसरात 14 दिवस सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती दिंडोरी आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे
बाधित रुग्ण हा शेतकरी असून भाजीपाला विक्रीच्या निमित्ताने नाशिक येथील पंचवटी मार्केट यार्ड येथे त्याचे येणे-जाणे होते, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशीरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.