नाशिक -नाशिक नववर्ष यात्रा स्वागत समितीकडून ढोल ताशांच्या महावादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सैनिकांसाठी समर्पित होता. पंचवटी येथील यशवंत पटांगणावर हा कार्यक्रम पार पडला. यात नाशिक जिल्ह्यातील ३५ ढोल पथकांतील १५०० वादकांनी सहभाग घेतला होता.
नाशिक हे पूर्वीपासून ढोल पथकांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून ही संस्कृती वाढत आहे. या संस्कृतीचे जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग या ढोल पथकात सहभागी होतात. लय, ताल आणि नादाची अनुभूती नाशिककरांनी यावेळी अनुभवली. ढोल ताशांसोबत मुख्य ध्वज आणि २१ सहध्वज नाचवले गेले. ढोल आणि ताशांच्या माध्यमातून ब्रम्हनादाचा अनुभव नाशिककरांना घेता आला.
महिला ढोल वादकांनी वेधले लक्ष