महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये धनगर समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन - धनगर समाज आक्रमक

धनगर समजाला आरक्षण मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. धनगर समाज कृती समितीच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले.

Dhangar Samaj agitation
धनगर समाजाचे आंदोलन

By

Published : Sep 28, 2020, 8:14 PM IST

नाशिक- धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा, धनगर विद्यार्थ्यांसाठी विभागनिहाय वसतीगृह उभारण्यात यावे, धनगर समाजासाठी लागू असलेल्या २२ योजनांसाठी तात्काळ एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी आज धनगर समाज कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले आहे.

धनगर आणि धनगड हा एकच शब्द असून धनगड समाजाला एसटी आरक्षण मिळते मात्र धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहत असल्याने केंद्र आणि राज्य शासनाने याची दखल घेऊन धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचे सध्या पाहायला मिळते. आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी धनगर समाज कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ आंदोलन करण्यात आले.

दरम्यान धनगर समाजासाठी शासनाने लागू केलेल्या 22 योजनांसाठी शासनाने समन्वय साधून तात्काळ एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी विभाग निहाय वसतिगृहांची उभारणी करण्यात यावी, मेंढपाळ समाज बांधवांवर होणारे अत्याचार आणि हल्ले रोखण्यासाठी त्यांना शस्त्र परवाने देण्यात यावे, घोंगडी व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आल्या आहेत. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित उपाययोजना केल्या नाही तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यामुळे धनगर समाज कृती समितीच्या आंदोलनाची दखल शासन घेणार की, धनगर समाज आपल्या मागण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करणार हर बघणं महत्वाचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details