महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण - narhari zirwal corona infected

झिरवाळ यांच्या विधानभवन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे, कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. अधिकारी, कर्मचारी यांना क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता झिरवाळ यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

By

Published : Sep 26, 2020, 4:25 PM IST

Updated : Sep 26, 2020, 4:35 PM IST

दिंडोरी (नाशिक)- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात नरहरी झिरवाळ यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला होता. मात्र, पटोले पाठोपाठ आता झिरवाळ यांनाही कोरोना झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

झिरवाळ यांच्या विधानभवन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे, कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. अधिकारी, कर्मचारी यांना क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता झिरवाळ यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. असे आवाहन झिरवाळ यांनी केले असून, लवकरच कोरोनावर मात करून मी सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे. असे झिरवाळ यांनी सांगितले.

हेही वाचा-पीक नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करा; नाशकात कृषीमंत्र्यांंचा पाहणी दौरा

Last Updated : Sep 26, 2020, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details