नाशिक - बेपत्ता महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. उपनगरच्या जेलरोड येथील रहिवासी ६० वर्षीय मंदाकिनी पाटील या १ फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. याप्रकरणी कुटुंबीयांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
बेपत्ता महिलेचा गोणीत आढळला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय हेही वाचा - नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू
मंदाकिनी पाटील यांच्याबाबत माहिती सांगणाऱ्याला कुटुंबीयांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या आशयाचे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. मंगळवारी दुपारी त्यांच्याच घराशेजारी असलेल्या भुखंडाजवळ एका गोणीतून वास येत होता. ही गोणी उघडताच त्यात स्थानिकांना मंदाकिनी यांचा मृतदेह आढळून आला.
बेपत्ता महिलेचा गोणीत आढळला मृतदेह, हत्या झाल्याचा संशय.. हेही वाचा - 'अर्थव्यवस्था संकटात नाही; मंदावलेल्या स्थितीत सुधारणा'
घटनास्थळी पंचनामा करून उपनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.