महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनमाडमध्ये कोरोनाचा शिरकाव, शहरात 4 दिवस कडकडीत बंद - नांदगांवचे तहसीलदार योगेश जमदाडे

मालेगाव येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब पाठवले असातना तो मनमाडमध्ये आला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केल्यानंतर या कर्मचाऱ्याच्या आईला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Manmad
मनमाडमध्ये कोरोनाचा शिरकाव

By

Published : May 2, 2020, 3:12 PM IST

मनमाड (नाशिक)- कोरोनाने मनमाड शहराच्या चारही बाजूला धुमाकूळ घातला होता. परंतु, शुक्रवारपर्यंत कोरोनामुक्त असणाऱ्या मनमाडमध्ये आता कोरोनाने शिरकाव केला आहे. एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मालेगाव येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब पाठवले असातना तो मनमाडमध्ये आला होता. त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केल्यानंतर या कर्मचाऱ्याच्या आईला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनमाड शहरात पहिलाच कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यानंतर आज ज्या भागात ही महिला रुग्ण सापडली तो भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

मनमाडमध्ये कोरोनाचा शिरकाव

तसेच हा कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी ज्या-ज्या नागरिकांच्या संपर्कात आला आहे. त्यांना तपासणीसाठी नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. तर कोरोनाबाधित महिलेच्या घरासह आजूबाजूच्या सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

नांदगावचे तहसीलदार योगेश जमदाडे, मनमाडचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जी. एस. नरवणे यांच्यासह पथकाने आज कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच आजपासून पुढील 4 दिवस मनमाड शहर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. आवश्यक मेडिकल किंवा जीवनावश्यक वस्तू नागरिकांना पालिकेच्या कर्मचाऱ्यामार्फत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी मेणकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details