नाशिक - शहर व परिसराला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. शहरात गेल्या पाच तासांपासून संततधार पाऊस सुरू झाला आहे. पहाटे सहा वाजल्या पासुन शहर आणि परिसरात बरसणाऱ्या पावसाने आता उघड दिली आहे. मात्र, पहाटेपासून बरसलेल्या पावसाने नाशिकारांना दिलासा दिलाय.
नाशिक शहर परिसरात संततधार पाऊस - नाशिक
जिल्ह्यातील मान्सूनने काहीशी उशिराने हजेरी लावली असली तरी तीन दिवसापासून नाशिक व ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, चांदवड, निफाड, या तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला असून खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक, येवला ,नांदगाव ,चांदवड या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी देखील मालेगाव ,सटाणा, देवळा, कळवण या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. या भागात गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असुन पावसाच्या आगमनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.