महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार - मंत्री छगन भुजबळ - mid day meal scheme chhagan bhujbal

महाराष्ट्र शासन व मंडळाने बांधकाम कामगारांना होणाऱ्या जेवणाची अडचण विचारात घेऊन बांधकाम कामगारांना कामाच्याठिकाणी “मध्यान्ह भोजन योजना' जाहीर केली आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये सुरू केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ आज होत आहे. या योजनेंतर्गत बांधकामाच्या ठिकाणावरील नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळणार आहे.

Construction workers will get nutritious food thourgh mid day meal scheme nashik
मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार

By

Published : Sep 30, 2021, 10:56 AM IST

नाशिक - महाराष्ट्रात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहिर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मध्यान्ह भोजन योजनेचा’ शुभारंभ झाला असून या योजनेअंतर्गत बांधकाम मजूरांना सकस आहार मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकच्या उद्योग भवन, सातपूर एमआयडीसी येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मध्यान्ह भोजन योजनेचे शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, इमारत व इतर बांधकाम (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम 1966 च्या कलम 40 व 62 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिनियमांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम 2007 बनविले असून उक्त अधिनियमांच्या कलम 18 अन्वये कामगार दिनी दिनांक 1 मे 2011 रोजी “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामकामगार कल्याणकारी मंडळ" मुंबई येथे स्थापना केलेली आहे. या मंडळांतर्गत प्रत्येक जिल्ह्याकरिता कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम सुरू करण्यासाठी शासनाच्या इमारत व बांधकाम कामगार मंडळ यासाठी एक टक्का उपकर दिला जातो. या उपक्रमातून बांधकाम कामगारांना 28 प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. सन 2011 पासून सुरू झालेल्या या मंडळाकडे आतापर्यंत 11 हजार कोटी रुपयांचा निधी शिल्लक असून या निधीच्या माध्यमातून बांधकाम कामगारासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा -पोस्टिंग, ट्रान्स्फरबाबत होणार चौकशी? अनिल देशमुख प्रकरणी राज्य गृह विभाग उपसचिवाला ईडीची नोटीस

17 जिल्ह्यातील मजुरांना मिळणार लाभ -

महाराष्ट्र शासन व मंडळाने बांधकाम कामगारांना होणाऱ्या जेवणाची अडचण विचारात घेऊन बांधकाम कामगारांना कामाच्याठिकाणी “मध्यान्ह भोजन योजना' जाहीर केली आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये सुरू केलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ आज होत आहे. या योजनेंतर्गत बांधकामाच्या ठिकाणावरील नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बांधकाम कामगारांची रात्रीच्या जेवणाची निकड विचारात घेऊन सद्यस्थित मध्यान्ह भोजन व रात्रीचे जेवण बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे. तसेच कोरोना कालावधीत मध्यान्ह भोजन सर्व बांधकाम कामगारांना मोफत देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कामगारांना एका वेळेच्या जेवणात 1200 कॅलरीज मिळतील इतका आहार देण्यात येणार आहे. या आहारात रोटी, दोन भाजी, डाळ, भात व इतर आहार समाविष्ट असणार आहे, असेही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

पॅकबंद डब्यातून गरम जेवण मिळणार -

या योजनेकरिता मंडळाने मे. इंडो अलाईड प्रोटीन प्रा. लि. मुंबई या कंपनीस काम दिलेले आहे. सदर कंपनीने (एमआयडीसी सातपूर) या ठिकणी 20,000/- स्क्वे.फु. क्षेत्रामध्ये सुसज्य व्यवस्था केलेली आहे. जेवण उत्कृष्ट दर्जेचे देण्यासाठी सदर कंपनीने आधुनिक साधनाचा वापर करून बनविण्यात येणार आहे. तसेच तयार झालेले जेवण अत्यंत पॅकबंद डब्यातून गरम राहण्यासाठी सुसज्य वाहनाद्वारे जिल्ह्यातीलसर्व कामाच्या ठिकाणी पुरविले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व बांधकामाच्या साईटवर नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना आणि नाका बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सदरचे मध्यान्ह भोजन सद्यस्थितीत मोफत असणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नोंदीत व पात्र लाभार्थी बांधकामकामगारांना मागील 5 वर्षात सुमारे 35 कोटी रुपयाचे विविध योजनेतर्गत वाटप करण्यात आलेले आहे. तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांनी मंडळात नोंदणी करून मंडळाने जाहीर केलेल्या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details