नाशिक -महानगरपालिकेची 2022 ची निवडणूक काँग्रेस स्वबळावर जोमाने लढवणार असून जास्तीत-जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी संघटनेची बांधणी एक वर्ष आधीच सुरू केल्याचे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले.
स्वबळावर लढवणार
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काँग्रेस कार्यालयात पक्षाची बैठक संपन्न झाली. यावेळी काँग्रेस पक्षाचे आमदार, नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मागील निवडणुकीत पक्षाचे नुकसान का झाले याची सविस्तर चर्चा करण्यात आली. आघाडी धर्म पाळत असताना सहयोगी पक्षाने अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांच्या समोर उमेदवार उभे केल्याची खंत व्यक्त करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे काही उमेदवार पळवण्याचे काम सहयोगी पक्षाने केले. त्याचा मोठ्या प्रमाणात काँग्रेसला झाला असल्याचे आहेर यांनी सांगत आगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व जागा काँग्रेस पक्ष नाशिक शहरात स्वबळावर लढवणार असल्याचे शहराध्यक्ष आहेर यांनी सांगितले. याला सर्वच पद्धधिकाऱ्यांनीं देखील सहमती दर्शवली.
पक्षातील काही नेते पक्षाची हानी करण्याचे काम करत असल्याचे मत कॉग्रेस प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील यांनी बोलून दाखवत संघटना मजबूत करण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.आणि नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर त्यांनी टीका केली.
महानगरपालिका ठेकेदार चालवतात का?