नाशिक -वर्षभरापासून नाशिकरोड मनपा कार्यालयाच्या समोरच मोठा खड्डा पडला आहे. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी काँग्रेसकडून मंगळवारी आंदोलन छेडण्यात आले.
खड्डा बुजवण्यासाठी विधीवत पूजा करत काँग्रेसचे आंदोलन
खड्डा बुजवण्यासाठी भूमिपूजनही तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस झाल्यानंतर अद्याप कुठली ही पावले उचलण्यात आलेली नाहीत. पावसळ्याचे दिवस असल्यामुळे मनपा प्रशासन लोकांचे जीव घेणार काय? हा प्रश्न नागरीकांमध्ये आहे.
खड्डा बुजवण्यासाठी तीन महिन्यांपूर्वीभूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, अनेक दिवस झाल्यानंतरही कुठलीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मनपा प्रशासन लोकांचे जीव घेणार काय? हा प्रश्न आंदोलनकर्ते आणि नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे मंगळवारी काँग्रेस नाशिकरोड ब्लॉकच्या वतीने खड्ड्याची विधीवत पूजा करून साखळी उपोषण करण्यात आले.
या आंदोलनाची दखल घेत मनपाच्या वतीने आरोग्य अधिकारी संजय गोसावी यांनी मध्यस्ती करत या आठवड्यात सदर खड्डा बुजवण्याचे काम चालू होईल, असे आश्वासन दिले. यानंतर रोड मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला सूचना देत, काम चालू करण्याचे आदेश दिले.