महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरी तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करणार - जिल्हाधिकारी मांढरे - डोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बाग

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज (शनिवार) दिंडोरी तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी दिंडोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करुन महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

द्राक्षांची पाहणी करताना जिल्हाधिकारी

By

Published : Nov 2, 2019, 11:26 PM IST

Updated : Nov 2, 2019, 11:33 PM IST

नाशिक- दिंडोरी तालुक्यात सातत्याने पडणाऱ्या परतीच्या पावसाने द्राक्ष बागांसाह टोमॅटो, सोयाबीन, मका, भात, नागली वरईचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिंडोरी तालुक्याचा दौरा करुन नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

पाहणी करताना जिल्हाधिकारी


यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानी बाबत जिल्हाधिकारी मांढरेंनी माहिती घेतली. सातत्याने पडणाऱ्या पावसाने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी दररोज औषधे फवारणी करत पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, सातत्याने पडणाऱ्या पावसाने द्राक्षमणींनी कुज झाली असून मनी गळून मोठे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी महसूल यंत्रणेला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.


यावेळी तहसीलदार कैलास पवार, कृषी अधिकारी अभिजित जमधडे, शिवाजी जाधव, दिलीप जाधव, चंद्रकांत राजे, विशाल जाधव, बाळासाहेब मुरकुटे, सुजित मुरकुटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Last Updated : Nov 2, 2019, 11:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details