महाराष्ट्र

maharashtra

'कष्टाने कमावलेल्या वर्दीला डाग लागू देऊ नका'

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांच्या 117 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी 689 पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले आहेत.

By

Published : Dec 30, 2019, 2:43 PM IST

Published : Dec 30, 2019, 2:43 PM IST

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक- मोठ्या कष्टाने कमावलेल्या वर्दीला डाग, कलंक लावू देऊ नका, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत आयोजित दीक्षांत सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

हेही वाचा -'....म्हणून आपण एकाच बॅचचे'

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांच्या 117 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी 689 पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह पोलीस अधिकारी, मान्यवर आणि नातलग उपस्थित होते.

पोलीस दलातदेखील काळानुसार आधुनिकता आली पाहिजे -

भविष्यात पोलिसांसमोर आव्हान पेलण्यासाठी पुढच्या वर्षी पुरस्कारात मानाच्या तलवारीची जागा रिव्हॉलव्हरने घेतली पाहिजे, अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकार पोलीस दलाला सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वासदेखील ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पोलीस अकादमीत सुधारणा करून सर्वांना हेवा वाटेल अशी अकादमी बनवून दाखवू, पोलिसांना कुठलेच सणवार नसतात, नेहमीच कामात व्यस्त असतात. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी करणं माझी जबाबदारी असल्याचे म्हणत खडतर आव्हाने स्वीकारताना तुम्ही त्यात एकटे नसून महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी नवोदित पोलीस उपनिरीक्षकांना नवीन आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तुम्ही मोठ्या कष्टाने कमवलेल्या वर्दीला कलंक आणि डाग लावू देऊ नका, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रत्येक क्षेत्रात हिरो असतात. तसेच तुम्ही देखील तुमच्या क्षेत्रात हिरो असून या सर्व नायकांना माझा मानाचा मुजरा असल्याचे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी पुरस्कार विजया पवार, तर मानाची तलवार संतोष कामटे यांना प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला बेस्ट आऊट डोअर स्टडीसाठी सागर साबळे, बेस्ट ऑफ इंडोर स्टडी संतोष कामटे तर, बेस्ट ट्रेनीसाठी विजया पवार यांचा गौरव करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details