महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री? - chhagan bhujbal guardian minister news

आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवले होते. त्यावेळी भुजबळ यांच्याकडे बांधकाम खाते आणि पर्यटन विभाग असल्याने त्यांनी नाशिक-मुंबई महामार्गापासून ते नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलला होता.

Chhagan Bhujbal will be Nashik's Guardian Minister
छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री?

By

Published : Nov 29, 2019, 1:38 PM IST

नाशिक - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनी गुरुवारी मंत्री पदाची शपथ घेतली असून नाशिकच्या पालकमंत्री पदासोबतच भुजबळ यांना जलसंपदा किंवा गृह खाते दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राज्यातील मंत्रिमंडळात कोणतेही खाते मिळाले तरी नाशिक जिल्ह्याचे भुजबळ पालकमंत्री होणार अशी चर्चा आहे.

छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री?

हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांनी लपवले फौजदारी गुन्हे, नागपूर न्यायलयाने बजावली नोटीस

आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवले होते. त्यावेळी भुजबळ यांच्याकडे बांधकाम खाते आणि पर्यटन विभाग असल्याने त्यांनी नाशिक-मुंबई महामार्गापासून ते नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलला होता. तसेच पर्यटनाची अनेक कामे जिल्ह्यात केली होती.

हेही वाचा -#CMO ट्विटरवरून फडणवीसांचा फोटो चेंज...फेसबुकवर मात्र तोच

२०१४ साली काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार पायउतार झाले आणि नव्याने भाजप सरकार सत्तेवर आले. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. मात्र, मागील पाच वर्षात त्यांच्याकडून जिल्ह्यात ठोस अशी कुठलीच कामे झाल्याचे दिसून आले नसले, तरी नैसर्गिक आपत्ती आणि महत्त्वाच्या प्रश्नावर ते धावून येत त्यांनी प्रश्न मार्गी लावले आहेत. २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याचे नियोजन देखील महाजन यांच्या काळात झाल्याचे दिसून आले. पुन्हा एकदा छगन भुजबळांकडे पालकमंत्री पद येणार असल्याने भुजबळांची नाशिक जिल्ह्यावरील पकड आणखी घट्ट होणार असून नाशिक जिल्ह्याचा विकास होईल, अशी अशा नाशिककरांना वाटत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details