महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छगन भुजबळांनी वैजापूरमधून निवडणूक लढवावी; वैजापूर विकास नागरी कृती समितीचे निवेदन - दुष्काळ

छगन भुजबळांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीने भुजबळांना निवेदन दिले आहे. याच दरम्यान भुजबळांनी येवला मतदारसंघ सोडून जाऊ नये, यासाठी येवल्यातील नागरिकांनी संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

छगन भुजबळांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी

By

Published : Jul 12, 2019, 8:05 PM IST

Updated : Jul 12, 2019, 8:37 PM IST

नाशिक- छगन भुजबळांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीने भुजबळांना निवेदन दिले आहे. याच दरम्यान भुजबळांनी येवला मतदारसंघ सोडून जाऊ नये, यासाठी येवल्यातील नागरिकांनी संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

वैजापूर विकास नागरी कृती समितीचे छगन भुजबळांना निवेदन

येवला मतदारसंघात मागील १५ वर्षांपासून छगन भुजबळ आमदार म्हणून नेतृत्व करत आहे. या मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे करून येवल्याचा चेहरामोहरा बदलला. तर या पुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून उमेदवारी करावी, यासाठी वैजापूर विकास नागरी कृती समितीच्यावतीने आज वैजापूर येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळने शेकडो कार्यकर्त्यांसह येवला संपर्क कार्यालयात येऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली.

वैजापूर मतदारसंघ हा येवला मतदारसंघापासून जवळ असूनही विकासापासून कोसो मैल दूर आहे. वैजापूर मागास परिस्थितीत असून वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायेत खितपत पडला आहे. या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सक्षम नेतृत्व असल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपणास आम्ही सक्षम नेतृत्व म्हणून पाहतो, असे म्हणत भुजबळांना शिष्टमंडळाने निवेदन केले.

यावेळी छगन भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेत आभार मानले. ते म्हणाले, की मी गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय काम करत असून जनतेची सेवा करणे हा माझा उद्देश आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना प्रतिनिधीकडे मांडणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे वैजापूर आणि येवल्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. मी त्याचा आदर करतो.

विधानसभेची निवडणूक भुजबळ कुटुंबीयातील केवळ दोनच व्यक्ती लढणार आहे. एकावेळेस ३ लोक लढणार नाही. मी कोणत्या मतदारसंघातून लढवू, याबाबत पक्ष निर्णय घेणार आहे. परंतु, आपल्या भावना पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहोचवू, असे त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.

Last Updated : Jul 12, 2019, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details