महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Farm Laws Repealed : 'देर आये दुरुस्त आये', छगन भुजबळांचा टोला - तिन्ही कायदे रद्द

केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांविरोधात मागील दीड वर्षापासून शेतकरी लढा देत आहे. या आंदोलनाची कदाचित देशाच्या आणि जागतिक इतिहासामध्ये नोंद होईल, इतके अभूतपूर्व आंदोलन होते. मागील एका वर्षापासून काळे कायदे रद्द करा यासाठी महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) अंहिसेच्या मार्गाने दिल्लीच्या वेशीवर शेतकरी लढा देत आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ

By

Published : Nov 19, 2021, 12:33 PM IST

नाशिक - गुरुनानक जयंतीच्या (Guru Nanak Jayanti) दिवशी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे (Three agricultural laws) रद्द केले. हा निर्णय स्वागतार्ह असून उत्तर प्रदेशसह आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. लवकर हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण ठिक आहे 'देर आये दुरुस्त आये' असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोदी सरकारला लगावला आहे. केंद्र सरकारने (Central Government) कृषी कायदे रद्द केल्याने सरकारचा ‘देर है दुरस्त है’ असे धोरण समोर येत असून, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शेतकर्‍यांचे अभिनंदन केले आहे.

आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली -

केंद्र सरकारने वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांविरोधात मागील दीड वर्षापासून शेतकरी लढा (Farmers fight) देत आहे. या आंदोलनाची कदाचित देशाच्या आणि जागतिक इतिहासामध्ये नोंद (Recorded in world history) होईल, इतके अभूतपूर्व आंदोलन होते. मागील एका वर्षापासून काळे कायदे रद्द करा यासाठी महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) अंहिसेच्या मार्गाने दिल्लीच्या वेशीवर शेतकरी लढा देत आहे. उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा यासंह देशातील शेतकरी उन्हात, थंडीत व पावसात आपल्या मागणीवर ठाम राहिले. आंदोलनात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. हे दुर्देवी होते. सरकारने हा निर्णय अगोदर घेणे आवश्यक होते. मागे झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठा फटका बसला. आगामी युपीसह इतर राज्यातील निवडणुका भाजपाला जड गेल्या असत्या. त्यामुळे उशीराने का होईना हा निर्णय घेतला. जे शेतकरी या आंदोलनात शहिद झाले त्यांना भुजबळ यांनी श्रध्दांजली वाहिली.

ABOUT THE AUTHOR

...view details