महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छगन भुजबळ यांनी घेतली नाशिकच्या नव्या आयुक्तांची भेट - राष्ट्रवादी

छगन भुजबळ यांनी घेतली नाशिकचे नवे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली.

छगन भुजबळ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट

By

Published : Mar 26, 2019, 11:21 PM IST

नाशिक- पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची आज छगन भुजबळ यांनी भेट घेतली. यावेळी विश्वास पाटील यांनी अनेक महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी घेतली विश्वास नांगरे पाटील यांची भेट

नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली. दरम्यान, त्यांची आज छगन भुजबळ यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,

विश्वास पाटील यांनी मुंबईत झालेल्या आतंकवादी हल्ल्यावेळी त्यांनी निधड्या छातीने काम केले. तसेच इतरही अनेक आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या भूमिका त्यांनी बजावले आहेत. त्यांच्या या कामांना आमच्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, नाशिकमध्ये यापुढील कामकाजासाठी आमचा पूर्ण सहकार्य असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details