महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोर्ट आणि वकील म्हटलं की मला अजुनही हुडहुडी भरते'

आपल्या देशात अनेक जाती-धर्म-प्रांत आहेत, तरीही या देशात लोकशाही मजबूतपणे उभी आहे. त्याचे श्रेय हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या कायद्याला आहे. तरीही कोर्ट आणि वकील म्हटलं की मला अजुनही हुडहुडी भरते, असे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ

By

Published : Feb 16, 2020, 8:09 PM IST

नाशिक - कोर्ट आणि वकील म्हटलं की मला अजुनही हुडहुडी भरते, असे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्ताचे सरकार हे फास्ट ट्रॅक कोर्टासारखे काम करते, असेही भुजबळ म्हणाले.

'कोर्ट आणि वकील म्हटलं की मला अजुनही हुडहुडी भरते'

आपल्या देशात अनेक जाती-धर्म-प्रांत आहेत, तरीही या देशात लोकशाही मजबूतपणे उभी आहे. त्याचे श्रेय हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या कायद्याला आहे. १३५ वर्षानंतर देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे नाशिकमध्ये आले याचा आनंद आहे. समाजाला आणि न्यायव्यवस्थेला असणारी गरज लक्षात घेता न्यायालयीन कामे तातडीने व्हायला हवीत यासाठी मंत्रिमंडळाने अगदी फास्ट ट्रॅक पद्धतीने १७१ कोटी रुपयांच्या नव्या इमारतीला मंजुरी दिली, असे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा -तुमच्यात हिंमत असेल तर लावा नवीन निवडणूक; तुम्ही तिघे आम्ही एकटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, राज्यघटनेत तयार केलेला कायदा कुठल्या व्यक्तीच्या हातात जाईल त्यानुसार त्याचा वापर करत असतो. त्यामुळे कायदा योग्य व्यक्तीच्या हातात जाऊन न्याय देण्याची जबाबदारी न्यायालय आणि वकिलांची आहे. नाशिकला निर्माण केलेल्या न्यायालयात सर्व न्याय प्रक्रिया पूर्ण होतील. भविष्यात गरज निर्माण झालीच तर नाशिकला खंडपीठ निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या मीडिया ट्रायलमुळे न्याय व्यवस्थेवर दबाव निर्माण होतो. तो दबाव झुगारून प्रत्येकाला न्याय मिळवून देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता न्याय व्यवस्थेने काम करायला हवे, असेही भूजबळ म्हणाले.

यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नकुमार मिश्रा, वकील परिषदेचे निमंत्रक अॅड. जयंत जायभावे, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष अॅड. सतीश देशमुख, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष अॅड. अमोल सावंत, अॅड. आसिफ कुरेशी, ज्येष्ठ विधीज्ञ हर्षद निंबाळकर, आशिष देशमुख, यांच्यासह बार कौन्सिलचे सर्व पदाधिकारी सदस्य, गोवा व महाराष्ट्रातून आलेले सर्व ज्येष्ठ विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details