महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळात नाशिक जिल्ह्यात मनुष्यहानी नाही; अन्य नुकसानीसाठी पॅकेज जाहीर होणार - निसर्ग चक्रीवादळातील नुकसान भरपाई

शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, त्यात काही अडचणी असतील तर त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. जे शेतकरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र आहेत, परंतु निवडणुका व कोव्हिडमुळे त्यांची कर्जमुक्ती थांबली आहे. ते शेतकरी कर्जमुक्त आहेत, असे गृहीत धरुन त्यांना पुढील पीक कर्ज देण्यात यावे. जिल्ह्यातील पीक कर्जाचे उद्दिष्ट्य हे मोठे आहे आणि ते सर्व बँका जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पूर्ण करतील, असा विश्वासही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.

ashik Guardian Minister Chhagan Bhujbal
पालकमंत्री छगन भुजबळ

By

Published : Jun 5, 2020, 8:27 AM IST

Updated : Jun 5, 2020, 10:06 AM IST

नाशिक - राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात बुधवारी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात नुकसान झाले. या वादळाचा नाशिक जिल्ह्यालाही फटका बसला. मात्र, कुठेही मनुष्यहानी झालेली नाही. परंतू 56 जनावरे दगावली आहेत. 190 पक्क्या घरांचे अंशत: तर 64 कच्च्या घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. शासनाकडून या निसर्ग चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या जनावरांसाठी व झालेल्या अन्य वित्तीय हानीसाठी लवकरच पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

आढावा बैठक

भुजबळ यांनी गुरुवारी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, कोविड-19 व खरीप हंगाम पूर्व तयारी या बाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, आदी उपस्थित होते.

निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात मनुष्यहानी नाही; अन्य नुकसानीसाठी शासनामार्फत पॅकेज जाहीर होणार
यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, चक्रीवादळामुळे जिल्ह्यात 1 हजार 317 विद्युत पोल पडले आहेत. हे विद्युत पोल तत्काळ दुरुस्त करणे अथवा नवे पोल बसविण्याचे काम तात्काळ करण्यात यावे. सद्यस्थितीत कुठल्याही गावाचा विद्युत पुरवठा पुर्णत: खंडीत आहे अशी परिस्थिती नाही. परंतु येणाऱ्या 24 तासात जिल्ह्यातील सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा पूर्ववत होईल याची खबरदारी महावितरणने घ्यावी. आजच्या स्थितीत विद्युत पुरवठा बंद असेल तर लोकांचे दैनंदिन सर्व व्यवहार ठप्प होतात. शेतकऱ्यांचा व ग्रामीण भागातला विद्युत पुरवठा शक्यतो खंडीत होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, त्यात काही अडचणी असतील तर त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. जे शेतकरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र आहेत, परंतु निवडणुका व कोव्हिडमुळे त्यांची कर्जमुक्ती थांबली आहे. ते शेतकरी कर्जमुक्त आहेत, असे गृहीत धरुन त्यांना पुढील पीक कर्ज देण्यात यावे. जिल्ह्यातील पीक कर्जाचे उद्दिष्ट्य हे मोठे आहे आणि ते सर्व बँका जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पूर्ण करतील, असा विश्वासही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला. बारदानाअभावी मका खरेदीस अडचणी येत असल्याने व्यवस्थापकीय संचालक पणन विभाग यांचेशी बैठकीतून संपर्क साधून त्यांनी टेंडर प्रक्रिया लवकर पूर्ण करून बारदान स्थानिक पणन विभागास उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.

त्या दिवशी कोरोना हरेल..

जिल्ह्याची लोकसंख्या ही सुमारे 62 लाख एवढी आहे. 62 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ 341 कोविड रुग्ण उपचार घेत असून त्यातील 16 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. तसेच केवळ 3 रुग्ण अतिदक्षता विभागात आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजना ह्या प्रभावी व यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे लॉकडाउन शिथील करण्याच्या दिशेने शासनाने निर्णय घेतला आहे. कोरोना आजाराबाबत आता सकारात्मक विचार करुन त्याचे आजपर्यंतच्या रुग्णांची गणना करण्यापेक्षा खरोखरच आज किती रुग्ण उपचार घेत आहेत, पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेले किती आहेत हे ही समाजासमोर आणण्याची जबाबदारी शासन, प्रशासन , नागरिक आणि माध्यमांचीही आहे. त्यासाठी सर्वांना ताकदीने कोरोनामुक्तीसाठी काम सुरु ठेवावे लागणार आहे. ज्या दिवशी शाळा व महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय होईल त्यादिवशी आपण जिंकलो आणि कोरोना हरला असे चित्र आपण येणाऱ्या काळात पाहू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Last Updated : Jun 5, 2020, 10:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details