नाशिक - महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. काँग्रेसने अधिक जोर लावला असता, तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस एकत्र सरकार स्थापन करणार या प्रश्नावर राजकारणात काहीही होऊ शकते, असा भुजबळांनी सांगितले आहे.
'काँग्रेसने अधिक जोर लावला असता, तर आघाडीच्या जागा वाढल्या असत्या' - Assembly Election Results
सातारा लोकसभा जागा राष्ट्रवादी जिंकणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेला जागा राखण्यात अपयश आले असून नांदगावमध्ये मात्र बदल होणार असल्याचे त्यांनी म्हटले.
छगन भुजबळ
सातारा लोकसभा जागा राष्ट्रवादी जिंकणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेला जागा राखण्यात अपयश आले असून नांदगावमध्ये मात्र बदल होणार असल्याचे त्यांनी म्हटले. लोकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसला असून नवीन युवा चेहरे पुढे येतील, असे भुजबळ यांनी सांगितले.