महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑक्सिजन, औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार - nashik dm suraj mandhare

ऑक्सिजन व औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

nashik corona oxygen
नाशिक कोरोना ऑक्सिजन

By

Published : Sep 24, 2020, 4:44 AM IST

नाशिक -जिल्ह्यात ऑक्सिजनची साठेबाजी होणार नाही, यासाठी प्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील, यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजनचा आणि औषध पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या लघु कृती गटाची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते.

गटाच्या मागील बैठकीत नेमून दिलेल्या कामाची सद्यस्थिती सादर करणेबाबत संबंधित सदस्यांना जिल्हाधिकारी मांढरे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व सदस्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या बैठकीत सादर केला. जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांसाठी बुधवारी दररोज 3 हजार 801 ऑक्सिजनच्या जम्बो सिलिंडरची मागणी आहे. जिल्ह्यातील आजचा पुरवठा हा 5 हजार 571 जम्बो सिलेंडर इतका आहे. याबाबतची माहिती संबंधित महापालिका व नगरपालिका यांचेकडून संकलित केली असल्याचे यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा हा जिल्ह्यात सध्या रुग्णालयांना पुरेसा आहे. रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरविणाऱ्या स्टॉकिस्टकडेही वारंवार तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांना सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मदतीसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वाहनही अधिग्रहीत करून पुरवण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिल्या.

तसेच ज्या ठिकाणी सदर औषधाचा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास येईल त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details