नाशिक : Case registered against Sudhakar Badgujar शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्या सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणात गुन्हे शाखेकडून तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू आहे. त्यांच्या विरोधात नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात 33 लाख 68 हजाराचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामुळे बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात नगरसेवक असताना पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्याच कंपनीला कंत्राट दिल्याच्या एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी रात्री एसीबीच्या पथकाने बडगुजर यांच्या सावतानगर कार्यालयात त्यांची चौकशी केली, रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
सलीम कुत्ता प्रकरणानंतर 33 लाखाच्या फसवणूक प्रकरणी सुधाकर बडगुजरांवर गुन्हा दाखल - Salim Kutta case
Case registered against Sudhakar Badgujar : सलीम कुत्ता व्हिडिओ प्रकरण असो की, एसीबीच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार हा केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. यात काही तथ्य नाही एमडी प्रकरणात सत्ताधाऱ्यांविरोधात काढलेले मोर्चे यामुळे अडकवले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.
Published : Dec 18, 2023, 4:20 PM IST
काय आहे प्रकरण : सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात दिलेल्या पत्राच्या आधारे एसीबीकडून चौकशी सुरू होती. या पत्रात बडगुजर अँड बडगुजर कंपनीतून 2006 मध्ये निवृत्ती घेतल्या बाबत खोटी कागदपत्रे बनवल्याचा आरोप आहे. मनपामध्ये 2007 पासून नगरसेवक व इतर पदे भूषवतांना बडगुजर कंपनीला मनपाकडून विविध ठेके देत कंपनीच्या माध्यमातून 2007 ते 2009 या कालावधीत 33 लाख 69 हजार रुपये घेत आर्थिक फायदा केला, तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात बडगुजर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्याच कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. गेडाम यांच्या तक्रारीनुसार एसीबीकडून बडगुजर अँड बडगुजर या कंपनीची चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल काही दिवसापासून गुलदस्तात असतानाच, एसीबी 17 डिसेंबर ला रात्री उशिरा सरकारवाडा पोलिसात बडगुजर यांच्यासह तिघां विरोधात पदाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला, यामध्ये बडगुजर यांच्यासह त्यांचे साथीदार सुरेश भिका चव्हाण, साहेबराव रामदास शिंदे यांचा समावेश आहे.
हेही वाचा :