महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Crime: विधवा महिलेच्या तोंडाला फासले काळे, गळ्यात चपलांचा हार घालून काढली गावातून धिंड; गुन्हा दाखल - parade with footwear garlanded

नाशिकमध्ये एक घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील एका गावात एका विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासले. तिच्या गळ्यात चपलांचा हार घालत गावातून धिंड काढण्यात आली. या विरोधात वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime
विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासले

By

Published : Feb 1, 2023, 8:01 AM IST

प्रतिक्रिया देताना पीडित महिला

नाशिक:याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील एका गावातील एका कुटुंबातील विवाहितेचा किरकोळ अपघात झाला होता. तिचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे तिच्या हाताला प्लास्टर करण्यात आले. त्यानंतर तिला देखभालीसाठी तिच्या माहेरी पतीने आणून घातले. दरम्यान पती आपल्या दोन मुलांना पत्नीला एक दोनदा भेटायलाही घेऊन गेला. पत्नी माहेरी असतानाच पतीचे दहा दिवसापूर्वी निधन झाले. त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची माहिती पत्नीला देण्यात आली होती.

महिलेसोबत मुलांना मारहाण केली: माझे पती आत्महत्या करणार नाहीत, त्यांच्या घातपात झाला असा संशय दशक्रिया विधी प्रसंगी तिने व्यक्त केला. त्याचा राग येऊन उपस्थित पतीच्या बहिणीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी गावातील महिलांनांही पुढे त्या महिलेसोबत मुलांना मारहाण केली. महिलेचे तोंड काळे करून चपलांचा हार घातला. तिची गावभर धिंड काढली. या घटनेची माहिती वडनेर पोलीसांना मिळताच तात्काळ गावात जाऊन त्यांनी त्या महिलेची सुटका केली.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल:या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. यात सदर पीडित महिलेने घडलेला प्रकार कथन केला. यात तिने म्हटले की, मी माझ्या पत्नीच्या दहाव्याला गेले असताना गावातील लोकांनी मला मारहाण केली. माझ्यावर वेगवेगळे आरोप लावून माझ्या मुलांना मारले. माझ्यासोबत असलेल्या नातेवाईकांनाही मारले. मला डिझेल टाकून जाण्याचा प्रयत्न केला. माझ्या तोंडाला काळे फासून चपलांचा हार घालून गावातून धिंड काढली. यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण तयार झाले आहे.



गुन्हा दाखल:चांदवड तालुक्यातील शिवरे गावात घटना घडली आहे. सदर पीडित महिला तिच्या पतीच्या दशक्रिया विधीला गेली होती. तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. त्यानुसार तिच्यासह नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात चांदवड जिल्ह्यात एका विधवेला पतीच्या मृत्यूची माहिती विचारल्याने इतर महिलांनी तिची गावात चपलांचा हार घालून धिंड काढल्याची घटना झाली आहे. महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का देणाऱ्या या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा: Attack On Shopkeeper in Nalanda : सिगारेट उधार न दिल्याने दुकानदाराचा डोळा फोडला.. चाकूने केला हल्ला..

ABOUT THE AUTHOR

...view details