नाशिक -राज्यात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाची एकही प्रत विकली जाणार नाही. सरकार म्हणून आम्ही याची काळजी घेऊ, असे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांबरोबर केल्यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाची एकही प्रत विकली जाणार नाही - छगन भुजबळ
राज्यात 'त्या' पुस्तकांची एकही प्रत विकली जाणार नाही. सरकार म्हणून आम्ही याची काळजी घेऊ, असे वक्तव्य अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
हेही वाचा -'एखाद्या नेत्याची भाटगिरी किती करावी याचे भान ठेवायला हवे'
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या जाणता राजा या उपाधीला भाजपकडून विरोध होत आहे. यावर देखील छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पवारांना जाणता राजा म्हटले जाते. मात्र, ती तुलना नाही. मोदींची तुलना ही प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. मोदींनाही हे पटेल की नाही माहीत नाही. मात्र, कधी-कधी स्तुती करायला जातात आणि अशा चूका घडतात हे त्यांनाही कळत नाही, असा टोला देखील यावेळी भुजबळांनी लगावला.