महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओव्हर टेक का केले म्हणून  बस चालकाला पिकअप चालकाची बेदम मारहाण - pik-up\

नाशिकहून कोपरगावकडे निघालेल्या बसने महोदरी घाटात एक पिकअप गाडीला ओव्हरटेक केला. याचा राग येऊ पिकपअप चालक आणि त्याच्या साथीदारांनी बसचा पाठलाग करत बसला घाटात थांबवले. बस चालकाची काही चूक नसताना वाद घालत त्यास बेदम मारहाण केली आहे. दरम्यान बसमधील एका प्रवाशाने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रन केले आहे.

नाशिक

By

Published : Jun 22, 2019, 6:09 PM IST

नाशिक -ओव्हर टेक केल्याचा राग आल्याने पिकअप चालकाने बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना जिल्ह्यातील सिन्नर घाटात घडली आहे. मारहाणची ही घटना एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केली आहे. या घटनेवरून बस चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


एका गावाहून प्रवासी घेऊन त्यांना सुखरूपपणे इच्छा स्थळी पोहोचवणे, हा ध्यास घेऊन परिवहन महामंडळाची वाटचाल सुरू आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना अनेकदा अनपेक्षित प्रसंगाला तोंड द्यावे लागते. अगदी सुट्ट्या पैशापासून तर गाडीला विलंब झाला, तरी प्रवाशांकडून शब्दांचा मारा होतो. डोक्यावर कायम समस्यांचे ओझे घेऊन बस बरोबर धावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कित्येकदा इतर वाहनचालकांच्या जाचालाही सामोरे जावे लागते.

नाशिक


नाशिक-पुणे महामार्गावर अशाच एका प्रसंगाला बस वाहनचालकास सामोरे जावे लागले आहे. नाशिकहून कोपरगावकडे निघालेल्या बसने महोदरी घाटात एक पिकअप गाडीला ओव्हरटेक केला. याचा राग आल्याने पिकपअप चालक आणि त्याच्या साथीदारांनी बसचा पाठलाग करत बसला घाटात थांबवले. त्यानंतर बस चालकाची काही चूक नसताना वाद घालत त्यास बेदम मारहाण केली आहे. दरम्यान बसमधील एका प्रवाशाने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रन केले आहे.


स्वतःच्या घरापासून कोसो दूर राहत कर्तव्य बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे धावते घर हे आता सुरक्षित नाही. अशा घटना वारंवार होऊ नयेत. त्यासाठी यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र शासन या विषयी उदासीन असल्याचे पाहायला मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details