नाशिक - कळवण तालुक्यातल्या चणकापूर धरणाजवळ असलेल्या पुलाचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा पूल पाण्याखाली होता. आज (मंगळवार) सकाळी पुलावरील पाणी ओसरताच पुलाचा काही भाग कोसळल्याचे ते स्थानिकांनी निदर्शनास आणले.
नाशिकमधील चणकापूर धरणाजवळील पुलाचा भाग कोसळला - नाशिक पुल कोसळला
कळवण तालुक्यातल्या चणकापूर धरणाजवळ असलेल्या पुलाचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे. २०१३ साली म्हणजेच अवघ्या ६ वर्षांपूर्वी पुलाचे काम झाले होते. ६ वर्षातच पुलाचा एक भाग ढासळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
चणकापूर धरणातून गेल्या ४ ते ५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रविवारी १७ हजार क्युसेक पाणी तर सोमवारी ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला. ज्या ठिकाणाहून पाणी पुढे जाते त्या चणकापूर धरणाच्या नदीवर कनाशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा पूल आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चणकापूरच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. म्हणुन पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद होती.
आज सकाळी पुलावरील पाणी ओसरल्यानंतर या पुलाचा काही भाग कोसळल्याचे लक्षात आले. २०१३ साली म्हणजेच अवघ्या ६ वर्षांपूर्वी पुलाचे काम झाले होते. ६ वर्षातच पुलाचा एक भाग ढासळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, कळवण तालुक्यातील अनेक रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली असून लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे तालुक्यात रस्त्यांची कामे दर्जाहीन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.