नाशिक - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे उद्धव निमसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
स्थायी समितीत १६ पैकी भाजपचे ९, सेनेचे 4 तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. मनसे सदस्य अशोक मुर्तंडक हे अनुपस्थित राहिले. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी भाजपकडून उद्धव निमसे यांनी तर शिवसेनेकडून कल्पना पांडे यांनी अर्ज दाखल केला होता.
नाशिक पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे उद्धव निमसे - bjp
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे उद्धव निमसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
छाननीत दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली होती. निमसे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सेना युतीचा दाखला देत कल्पना पांडे यांना उमेदवारी अर्ज माघे घेण्याची विनंती केली. त्यानंतर कल्पना पांडे यांनी आपला अर्ज माघे घेतला. त्यामुळे निमसे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने जिल्हाधिकारी सुरज माढरे यांनी उद्धव निमसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निमसे यांची निवड जाहीर होताच भाजपने ढोल ताशांचा गजर करत जल्लोष साजरा केला. निमसे यांच्या रूपाने भाजपने सलग तिसऱ्या वर्षी पालिकेची तिजोरी आपल्या हाती ठेवली.