महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नव्हतं; मात्र, आता सर्वकाही चालतंय - चंद्रकांत पाटील - सामना संपादकाबाबत चंद्रकांत पाटील

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाली आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ठाकरे कुटुंबावर टीका देखील केली.

BJP state president chandrakant patil
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

By

Published : Mar 2, 2020, 8:11 AM IST

नाशिक - भाजप-शिवसेनेचे सरकार असताना रश्मी ठाकरे यांना सिद्धिविनायकाचे अध्यक्षपद घ्या म्हणून आग्रह धरला होता. याबाबत मी स्वतः उद्धव ठाकरे यांना बोललो होतो. मात्र, त्यांनी ते घेतले नाही. त्यावेळी ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नाही, असे मला म्हटले होते. मात्र, आता ठाकरे सर्व काही घेत आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. नाशिक भाजप कार्यालयात कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

ठाकरे कुटुंब स्वतःसाठी काही घेत नव्हतं; मात्र, आता सर्वकाही चालतंय - चंद्रकांत पाटील

कुठलाही अनुभव नसताना त्यांनी मुलाला कॅबिनेट मंत्री केले. आता वहिनींना सामनाचे संपादक केले आहे. मात्र, वहिनी संपादक म्हणून अतिशय चांगले काम करतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच रश्मी ठाकरेंचे अभिनंदन देखील केले.

संजय राऊत नाराज आहेत हे सर्व मनाचे खेळ आहेत. गेल्या ३-४ महिन्यात आपण बघितले आहे, की दररोज हा नाराज तो नाराज आहे. मात्र, सत्तेचा फेविकॉल इतका पक्का आहे की त्यांची नाराजी सायंकाळीच दूर होते.

ABOUT THE AUTHOR

...view details