नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी 'विजय संकल्प' बाईक रॅलीचे विधानसभास्तरीय आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विधानसभा मतदार संघात एन.डी पटेल रोड येथील वसंत स्मृती कार्यालय येथून ही रॅली काढण्यात आली.
मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी नाशकात 'विजय संकल्प' बाईक रॅलीचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी 'विजय संकल्प' बाईक रॅलीचे विधानसभास्तरीय आयोजन करण्यात आले आहे.
'देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मात्र, यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी बाईक रॅलीत नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. रॅलीमध्ये अनेक जण ट्रिपल सीट आले होते. तरीही पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात? की फक्त सामान्य नागरिकांनाच हेल्मेट नसल्यामुळे दंड आकारतात हे पाहणे महत्वाचे आहे. रॅलीमध्ये नाशिक विधानसभा मतदार संघातील भाजप नगरसेवक, पुरूष व महीला पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.