नाशिक- लोकसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी ईव्हीएम मशीनविरोधात एल्गार पुकारला आहे. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटाव देश बचाव, अशा घोषणा देत आंदोलकांनी निवडणूक आयोगासह सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
'ईव्हीएम'विरोधात नाशकात भारिपच्यावतीने घंटानाद आंदोलन
ईव्हीएम हटाव देश बचाव, अशा घोषणा देत आंदोलकांनी निवडणूक आयोगासह सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
नाशिक
नाशिकच्या शालिमार चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुका ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे. या करता आम्ही हे घंटानाद आंदोलन भारिप बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने करत असल्याची माहिती संजय साबळे यानी दिली.