नाशिक- काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची सर्वांनाच ओढ लागली आहे. त्यासाठी सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. रविवारी शहरात संध्याकाळी 6 ढोल पथकांच्या तालावर भद्रकालीच्या श्रीमंत राजाच्या आगमन झाले. यावेळी नाशिककरांनी मिरवणुकीचा मनसोक्त आनंद लुटला.
नाशिकच्या भद्रकाली श्रीमंत बाप्पाचे जोरदार स्वागत, 6 ढोल पथकांनी वेधले लक्ष - देवधर लेन
भद्रकाली गणपती राजाच्या मिरवणुकीचे हे यंदाचे दुसरे वर्ष आहे. रविवारी कारंजा परिसरातील देवधर लेनपासून संध्याकाळी 6 वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली.
भद्रकाली गणपती राजाच्या मिरवणुकीचे हे यंदाचे दुसरे वर्ष आहे. रविवारी कारंजा परिसरातील देवधर लेनपासून संध्याकाळी 6 वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली. तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी विराजमान असलेल्या चांदीच्या गणपती जवळ बाप्पाचे पूजन करण्यात आले.
गणरायाची 11 फूट भव्य दिव्य मूर्ती आणि त्यावर केलेली आकर्षक रोशनाई यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 6 ढोल पथकांनी यावेळी केलेल्या ढोल वादनाने परिसर दुमदुमून गेला होता. तसेच यावेळी वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले होते. कारंजा मेन रोडपासून पुढे भद्रकालीकडे ही मिरवणूक मार्गस्थ झाली.