नाशिक- विल्होळी गावात 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या शाब्दिक वादाचे काही मिनिटांत तुंबळ हाणामारीत रूपांतर झाले आणि या हाणामारीत दोनही गटातील 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले.
जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी, 8 जण गंभीर - Nashik Crime news
नाशिकच्या विल्होळी गावात राजवाडा परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबीयांमध्ये जमिनीचा निकाल एकतर्फी लागल्याच्या कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून मंगळवारी रात्री हे दोनही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.
नाशिकच्या विल्होळी गावात राजवाडा परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबीयांमध्ये जमिनीचा निकाल एकतर्फी लागल्याच्या कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून मंगळवारी रात्री हे दोनही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत लाठ्या-काठ्यांसह धारदार शस्त्राचाही वापर करण्यात आल्याने दोनही गटातील 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी नाशिकच्या तालुका पोलीस ठाण्यात दोनही गटाविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील सर्वच संशयित आरोपी जखमी असल्याने या प्रकरणी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.