महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bakri Eid Controversial Banner: बकरी ईदच्या शुभेच्छा बॅनरवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद नावाचा उल्लेख

नाशिकमध्ये काल बकरी ईद साजरी करण्यात आली. यावेळी ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला. यामुळे हा विषय चर्चेचा ठरला. या बॅनरमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने ते बॅनर तातडीने हटविण्यात आले.

By

Published : Jun 30, 2023, 4:07 PM IST

Bakri Eid Controversial Banner
बकरी ईदच्या शुभेच्छांचे हेच ते विवादित बॅनर

नाशिक: बकरी ईद निमित्त नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शुभेच्छा फलक झळकलेत. यात नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात लावण्यात आलेल्या एका बॅनरवर नाशिक ऐवजी गुलशनाबाद नावाचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे आता नव्याने वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते; मात्र काही तासानंतरच हे बॅनर हटवण्यात आले आहे.

मुघल साम्राज्यात नाशिकचे नाव गुलशनाबाद:मुघल साम्राज्यात नाशिकचे नाव हे गुलशनाबाद असे होतात. मात्र मुगल गेल्यानंतर गुलशनाबादचे नाव नाशिक असे ठेवण्यात आले; मात्र आता बकरी ईदच्या शुभेच्छा बॅनरवर नाशिकचे नाव गुलशनाबाद झळकल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. धार्मिक, आध्यात्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले होते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव नासिका असे नाव पडले. कालांतराने नासिकाचे नाव नाशिक असे ठेवण्यात आले.

ही आहे दुसरी आख्यायिका:त्याचबरोबर आणखी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर हे गाव वसले आहे. म्हणून ते ‘नवशिख’ म्हणून ओळखले जायचे. याच नवशिख शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन ‘नाशिक’ हे नाव पडले. याचे उदाहरण म्हणून नऊ टेकड्या आपल्याला नाशिक शहरात आजही पाहायला मिळत असल्याचे जाणकार सांगतात.


काही तासात बॅनर हटवले:बकरी ईद निमित्त नाशिकच्या सारडा सर्कल येथील महानगरपालिकेच्या कमानी वरती ईद शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. यामध्ये नाशिकचा उल्लेख हा गुलशनाबाद करण्यात आला होता. मात्र हे बॅनर सोशल मीडियावर झळकल्याने त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्यानंतर काही तासातच हे बॅनर हटवण्यात आले. नाशिकमध्ये पुन्हा मुघल साम्राज्य आणायचं आहे का? बॅनर लावण्यापूर्वी महानगरपालिकेची परवानगी घेतली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

मुगलप्रेमी डोके वर काढत असल्याची जाणीव: मागील महिनाभरात राज्यात विविध ठिकाणांवर मुगल बादशाह औरंगजेबचे पोस्टर झळकविणे, त्याचे पोस्टर घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासोबतच लातूर जिल्ह्यात काही औरंगजेबप्रेमींनी औरंगजेबाचे स्टीकर लावून स्टंटबाजी करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. यामुळे राज्यात मुगलप्रेमी डोके वर काढत असल्याची जाणीव होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details