नाशिक : आंघोळीसाठी तापवलेले पाणी बाथरूममध्ये काढून ठेवले होते, बाथरूममध्ये गेलेल्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा ( ten month old baby ) धक्का लागून तिच्या अंगावर गरम पाणी पडल्याने ( Hot water fell on body ) ती गंभीररित्या भाजली आहे. पाच दिवसाच्या उपचाराला प्रतिसाद देणाऱ्या चिमुकलीची अखेर प्राणज्योत मालावली (little girl finally died).
Baby girl dies : अंघोळीसाठी तापवलेले पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू - अंघोळीसाठी तापवलेले पाणी
आंघोळीसाठी तापवलेले पाणी बाथरूममध्ये काढून ठेवले होते, बाथरूममध्ये गेलेल्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा ( ten month old baby ) धक्का लागून तिच्या अंगावर गरम पाणी पडल्याने ( Hot water fell on body ) ती गंभीररित्या भाजली आहे. पाच दिवसाच्या उपचाराला प्रतिसाद देणाऱ्या चिमुकलीची अखेर प्राणज्योत मालावली (baby girl finally died).
अशी घडली घटना : पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नाशिकच्या जुन्या गंगापूर नाका परिसरात असलेल्या राठी आमराई भागातील श्री साई अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या शुभम इंगळे यांची आवेरा ही दहा महिन्यांची मुलगी शनिवारी खेळत असताना बाथरूम मध्ये गेली, त्याठिकाणी आंघोळीसाठी तापवलेले पाणी काढून ठेवलेले असताना दहा महिन्याच्या या चिमुकलीचा त्याला धक्का लागून तिच्या अंगावर गरम पाणी पडल्याने ती गंभीररित्या भाजली. पाच दिवसाच्या उपचाराला प्रतिसाद देणाऱ्या चिमुकलीची अखेर बुधवारी प्राणज्योत मालावली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तिच्या पश्चात आई वडील भाऊ असा परीवार आहे. त्यांच्या समाजात यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पालकांनी लक्ष देण्याची गरज :गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांचे अपघाती मृत्यू वाढले आहेत. सिडको भागात आईस्क्रीम साठी गेलेल्या एका चिमुकालीला फ्रीजचा शॉक लागून मृत्यू झाला होता. तसेच एका घटनेमध्ये पाण्याच्या हौदात पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांकडे बारीक लक्ष द्या असे आवाहन पोलिसांनी केले आहे.