नाशिक- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचा मुहूर्त साधत नाशिककरांनी घर, वाहने, सोने खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला. मागील वर्षीपेक्षा यंदा सर्वच वस्तूंची विक्री झाली असून साधारण 300 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. कोरोना काळात खऱ्या अर्थाने बाजाराने सीमोल्लंघन केल्याचे चित्र बघायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार रिअल इस्टेट क्षेत्रात तब्बल 700 पेक्षा अधिक फ्लॅट, रो हाऊस, पेंट हाऊसची बुकिंग व विक्री झाली तसेच गृहकर्जावरील व्याजदर कमी झाल्याने नागरिकांनी घर खरेदीला सर्वाधिक पसंती दिली. त्याचबरोबर वाहन बाजारातही गर्दी झाल्याचे दिसून आले.
- वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल
कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक वाहतूक अधिक धोकादायक ठरू शकते त्यामुळे स्वतःचे वाहन असावे या विचारातून वाहन खरेदीला ग्राहकांची प्राधान्य दिले. यात चारचाकी वाहनांची सुमारे अडीच हजार तर दुचाकी वाहनांची सुमारे साडेतीन हजारांच्या विक्री झाली. त्याच पाठोपाठ फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाइल आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा योग देखील ग्राहकांनी साधला.
- सोने खरेदीवर होत्या अनेक ऑफर्स