महाराष्ट्र

maharashtra

नाशिककरांवर तिसर्‍या लाटेचा धोका; तीन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ - जिल्हाधिकारी

By

Published : Jun 25, 2021, 7:38 AM IST

Updated : Jun 25, 2021, 8:28 AM IST

एनआयव्हीकडे पाठवलेल्या पाच टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस स्ट्रेनचा नवा रुग्ण आढळला नाही किंवा तो लगेच आढळेल असेही नाही. मात्र मागील तीन दिवसात रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले.

anxiety to Nashik residents - Collector
नाशिककरांवर तिसर्‍या लाटेचा धोका

नाशिक - मागील काही दिवसांपासून स्थिर असलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ही नाशिककरांसाठी चिंताजनक बाब आहे. डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला नसला तरी वाढती रुग्णसंख्या तिसर्‍या लाटेचा धोका दर्शवत असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.

नाशिककरांवर तिसर्‍या लाटेचा धोका

डेल्टा प्लस स्ट्रेनचा नवा रुग्ण आढळला नाही -

जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले. एनआयव्हीकडे पाठवलेल्या पाच टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस स्ट्रेनचा नवा रुग्ण आढळला नाही किंवा तो लगेच आढळेल असेही नाही. मात्र मागील तीन दिवसात रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे.

तिसर्‍या लाटेचा धोका -

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभिर्य लक्षात नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, त्यासोबतच कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसुत्रीचा नियमितपणे अंगीकार करावा, दोन लाटेचा अनुभव बघता ही वाढती रुग्णसंख्या तिसर्‍या लाटेत रुपांतर होईल हा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिककरांनी काळजी घ्यावी व कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

मागील तीन दिवसात वाढलेली रुग्णसंख्या -

२२ जून रोजी १८३ रुग्ण आढळले होते. तर २३ रोजी ३३८ पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली. तर २४ रोजी २६३ पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ झालेली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येने नाशिककरांच्या चिंतेत वाढ केली आहे.

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यावर कडक कारवाई -

कोरोनाचा वाढता धोका बघता जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहे. शनिवारी- रविवारी पर्यटन स्थळी गर्दी दिसून येत आहे. पर्यटन स्थळी जाणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दुपारी चारनंतर दुकाने बंद झाली, तरी नागरिक संचारबंदी असुनही विनाकारण घराबाहेर पडत आहे. ते बघता संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - नाशकात गेल्या चार महिन्यांत 69 अल्पवयीन मुली बेपत्ता, केवळ 7 मुलींचा शोध घेण्यात यश

Last Updated : Jun 25, 2021, 8:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details