नाशिक- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र आता उन्हाळा सुरू झाला असून काही भागात आतापासून पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. येवला तालुक्यात तर वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली होती. तहानेने व्याकूळ झालेल्या या प्राण्यांच्या पाणी पिण्याचा प्रश्न येवला किसान काँग्रेसने टँकरने सोडवला आहे.
पाणी टंचाईचा फटका; तहानेने व्याकूळ वन्यप्राण्यांची भटकंती, टँकरने भरले कृत्रीम पाणवठे
राजापूर, रेंडाळे या भागात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात हरीण, काळवीट, मोर असे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर असून त्यांना पिण्याच्या पाण्याकरता भटकंती करावी लागते.
येवला तालुक्यातील राजापूर, रेंडाळे या भागात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात हरीण, काळवीट, मोर असे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर असून त्यांना पिण्याच्या पाण्याकरता भटकंती करावी लागते. सध्या उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वन्यप्राण्यांना भेडसावत असल्याने येवला तालुका किसान काँग्रेस कमीटीच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद लोहकरे यांनी या वन्य प्राण्याकरता टँकरने वनविभागातील रेंडाळे येथील वॉटर होलमध्ये पाणी टाकण्यात आले. त्यामुळे या वन्यप्राण्यांची काही दिवसाकरता तहान भागणार आहे.