नाशिक - लग्नाच्या रेशीमगाठी कुठे जुळतील, हे सांगता येत नाही. असेच काहीसे धुळे जिल्ह्यातील राहुल पवार यांच्या बाबतीत घडले. त्यांचा विवाह अमेरिकेत राहणाऱ्या अलोव्हियाशी नुकताच पार पडला. अमेरिकेतील कायद्याप्रमाणे विवाहबद्ध झाल्यानंतर या दाम्पत्याने भारतीय संस्कृतीप्रमाणे नाशकात मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्नगाठ बांधली. दोघांनाही भारतीय विवाह पद्धतीचे आकर्षण असल्याने त्यांनी भारतामध्ये पुन्हा विवाह करण्याचा निर्णय घेतला.
म्हणून अनिवासी भारतीयाने अमेरिकन पत्नीबरोबर दुसऱ्यांदा केला विवाह...
धुळ्याचे राहुल पवार गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत नोकरी करतात. तिथे वास्तव्यास असताना त्यांची ओळख अलोव्हिया ओसगुड यांच्याशी झाली. दोघांचे विचार जुळले आणि काही दिवसातच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
धुळ्याचे राहुल पवार गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत नोकरी करतात. तिथे वास्तव्यास असताना त्यांची ओळख अलोव्हिया ओसगुड यांच्याशी झाली. दोघांचे विचार जुळले आणि काही दिवसातच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील कायदा आणि परंपरेनुसार विवाह केला. राहुल यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र, भारतीय संस्कृतीप्रमाणे विवाह व्हावा, अशी राहुल आणि अलोव्हियाची इच्छा होती. या इच्छेला दोघांच्या कुटुंबीयांनी होकार दिला. त्यानंतर लग्नाच्या जय्यत तयारीसह नाशकातली पंचवटी परिसरातील 'आठवण' लॉन्समध्ये हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला अलोव्हियाच्या आई-वडिलांसह कुटुंबीयही हजर होते.
हेही वाचा - तुम्ही श्वानाचा लग्न सोहळा पाहिलाय? उत्तर प्रदेशमध्ये थाटामाटात लावले चक्क एका श्वानाचे लग्न
वऱ्हाड मंडळीच्या साक्षीने वधु-वराने एकमेकांच्या गळ्यात हार घालून मंत्र उच्चारात अग्नीचे सात फेरे घेतले. यावेळी विदेशी पाहुण्यांच्या चेहऱ्यावर भारतीय संस्कृती जाणून घेण्याची उत्सुकता आणि आनंद दिसून येत होता.