नाशिक : सत्य मलिक लोकसेवा ग्रुपने मसगा महाविद्यालयात पुणे येथील अनिस कुट्टी यांच्या करियर मार्गदर्शनावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. कुट्टी यांनी उपस्थित दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नेव्ही, आर्मी, एअरफोर्स भरती अभ्यासक्रम या संदर्भात माहिती दिली. हा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हॉलबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. धार्मिक संदेशपर लावलेल्या फलकांवर आक्षेप घेत घोषणाबाजी केली.
Nashik Crime News : मालेगावमध्ये करियर मार्गदर्शनातून धर्मप्रसाराचा आरोप; महाविद्यालयाचे प्राचार्य निलंबित - पालकमंत्री दादा भुसे
मालेगावच्या मसगा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करियर मार्गदर्शन कार्यक्रमात धर्मिक प्रचार केला जात असल्याचा आरोप करत तरुणांच्या एका टोळक्याने गोंधळ घातला. याचवेळी आयोजकांचे बॅनर फडण्यात आले. या प्रकरणाला जातीय वळण मिळण्याची शक्यता लक्षात घ्या, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टोळक्याला बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संस्था अध्यक्षांची परवानगी न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्याने मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित करण्यात आले आहे.
करिअर मार्गदर्शन व्याख्यान :अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाला. प्राचार्य डॉ. निकम व आयोजकांनी असा कुठलाही प्रकार नसून केवळ करिअर मार्गदर्शनावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना दिली गेल्याचे स्पष्ट केले. मात्र तरुण आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी माहिती कळवण्यात आली. त्यानंतर पोलिस फाटा घटनास्थळी दाखल झाला, पोलिसांनी काही तरुणांशी चर्चा करून त्यांची समजूत घालत त्यांना बाहेर काढले. यानंतर पोलिसांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेतले.
जबाब बदलण्याचा प्रयत्न :परराज्यातून आलेल्या लोकांचे मनसुबे स्पष्ट होतात, असा आरोप पालकमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. एकाच धर्माच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन का? शिबिराच्या ठिकाणी धार्मिक बॅनर कधी लावले जातात का? असा सवाल पालकमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जबाब दिलेत ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांचे जबाब बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उपस्थित तरुणांनी केला आहे.
प्राचार्य निलंबित :मुळात मध्य प्रदेश, केरळ या भागातून मार्गदर्शन करण्यात करता आलेल्या धार्मिक नेत्यांना नेमके काय साधायचे आहे? याविषयी संशय बळावतो. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना मंदिर, मशिदीमध्ये अभ्यास करण्यासाठी राहायची व्यवस्था हे चर्चेचे मुद्दे होऊ शकत नाहीत, असे सांगत कारवाईसाठी पोलिसांनी एवढा उशीर केल्याबद्दल ही पालकमंत्री दादा भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संस्थेचे विश्वस्त प्राचार्य डॉ. जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेने समिती गठित केली आहे. समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. चौकशी समितीचा अहवाल मिळेपर्यंत प्राचार्य डॉ. निकम यांना निलंबित करण्यात आले आहे, असे मसगा महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Religious Conversion: मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर प्रकरण; उत्तर प्रदेश गाझियाबाद पोलिस पोहोचले मुंब्रा पोलीस ठाण्यात
- conversion : पाचवेळा जिमला जायचा मुलगा, बापाने पाठलाग करताच समोर आला धर्मांतराचा सापळा
- Jitendra Awhad : ४०० धर्मांतर झाल्याचे सिद्ध न केल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद - जितेंद्र आव्हाड यांचा इशारा